Category: ताज्या घडामोडी

  • . विधानसभा निवडणुकीतील परिवर्तनाचा प्रभाव कायम ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आमदार अभिजित पाटील यांचे मनसुबे उधळून लावण्यात माढ्याचे दादासाहेब साठे आणि नगराध्यक्षा ॲड मीनल साठे यांनी महत्वाची भूमिका बजावली त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे तीन जि प गट आणि लऊळ व रोपळे क पंचायत समिती गणात प्रभावी ठरली त्यामुळे आमदार पाटील यांना जबरदस्त सेटबॅक सहन करावा लागला

    . विधानसभा निवडणुकीतील परिवर्तनाचा प्रभाव कायम ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आमदार अभिजित पाटील यांचे मनसुबे उधळून लावण्यात माढ्याचे दादासाहेब साठे आणि नगराध्यक्षा ॲड मीनल साठे यांनी महत्वाची भूमिका बजावली त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे तीन जि प गट आणि लऊळ व रोपळे क पंचायत समिती गणात प्रभावी ठरली त्यामुळे आमदार पाटील यांना जबरदस्त सेटबॅक सहन करावा लागला

    माढा, दि.

    सीना नदीस आलेल्या महापूर परिस्थितीत सामाजिक बांधिलकी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून पुढे आलेल्या माढ्याच्या नगराध्यक्षा ॲड मीनल साठे यांना राजकीय दृष्ट्या कोंडीत पकडण्याचा आमदार अभिजित पाटील यांचा प्रयत्न आमदारांच्याच अंगलट आल्याचे चित्र जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक निकालातून स्पष्ट झाला आहे .
    लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी कार्यरत राहिलेल्या माढ्याच्या नगराध्यक्षा ॲड मीनल साठे यांनी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने त्यांना डावलल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश करत विधानसभेची निवडणूक लढवली त्यात त्यांचा पराभव झाला आणि आमदार अभिजित पाटील हे विजयी झाले या विजयात त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी राहिले ते अपक्ष उमेदवार रणजितसिंह शिंदे मात्र आपल्या विरोधात ॲड साठे यांनी निवडणूक लढवण्याची सल पाटलांच्या मनात अजूनही कायम असल्याचे जाणवते.
    लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीच्या सोबत राहण्याचा मतदारांचा कल हा विधानसभा निवडणुकीत देखील कायम राहिला आणि नगराध्यक्षा ॲड साठे या स्थानिक उमेदवार असतानाही आमदार पाटील यांना माढा शहरातून मताधिक्य मिळाले आणि येथेच नगरपंचायतीचा सुमारे एक वर्षाचा कार्यकाळ शिल्लक असतानाच नगरपंचायत आपल्या ताब्यात ठेवण्याची रणनीती डोळ्यासमोर ठेवून राजकीय समीकरणे जुळवण्याची तयारी सुरू झाली त्यात गैर काहीच नाही मात्र अशी समिकरणे जुळवताना मुख्य प्रतिस्पर्धी निवडणूक रिंगणात नसावा अशा पराभूत मानसिकतेतून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत मानेगाव जि प गटातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या दादासाहेब साठे यांना जि प निवडणुकीत पक्षाची उमेदवारी हवी असेल तर येणारी माढा नगरपंचायतची निवडणूक लढवणार नसल्याचे लेखी मागण्याची बालीश अट घालण्यात आली येथेच तालुक्याच्या राजकारणाची दिशा बदलली.
    मानेगाव जि प गटात सीना नदीस आलेल्या महापूराचा सर्वाधिक फटका बसलेल्या गावांचा समावेश होतो विधानसभा निवडणुकीत येथील मतदारांनी आमदार पाटील यांना चांगली साथ दिली होती महापूराची तिव्रता जाणवताच नगराध्यक्षा ॲड मीनल साठे आणि दादासाहेब साठे यांनी क्षणाचाही विलंब न करता सीना नदी काठच्या गावातील सुमारे पाचशे लोकांना माढ्यातील मंगल कार्यालयात निवारा उपलब्ध करून दिला आणि दैनंदिन जीवनातील प्राथमिक गरजा पासून सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या त्यावेळी त्यांनी आपपरभाव न पाहता नैसर्गिक आपत्तींमुळे आपदग्रस्तांच्या पाठीशी उभे राहण्यास प्राधान्य दिले आणि या भागातील जनतेच्या मनात आपुलकीची भावना निर्माण करण्यात त्या यशस्वी झाल्या आणि यातूनच दादासाहेब साठे यांची उमेदवारी जनतेतून पुढे येत असल्याचे चित्र समोर आले.
    मात्र माढ्याच्या राजकारणात साठे ज्यांना चालत नाहीत त्यांनी मानेगाव जि प गटातील उमेदवारीचा पेच कसा निर्माण होईल याची व्यवस्था केली अशी व्यवस्था करण्याच्या खेळीत आमदारांचा जि प निवडणुकीतील पराभव दडला होता हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट झाले आहे.
    सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वारसा लाभलेली जी काही घराणी आहेत त्यामध्ये माढ्याच्या साठे घराण्याचा समावेश होतो साठे गटाची शक्ती आहे प्रामुख्याने मानेगाव, टेंभुर्णी आणि उपळाई बुद्रुक या तीन जि प गटा बरोबर लऊळ व रोपळे क पंचायत समिती गणातील निवडणूक निकालावर परिणाम करणारी ठरली तालुक्याचे राजकीय समीकरणच बदलले आणि भाजपाला तालुक्यात विरोधकच राहिला नाही अशी परिस्थिती साठेंच्या निर्णयामुळे निर्माण झाली आणि त्यातूनच आजवर पुरोगामी विचाराचा वसा जपलेल्या माढा तालुक्यात भाजपाचे कमळ फुलले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही

  • घोटी येथे वक्तृत्व स्पर्धा आणि गुणवंतांच्या सत्काराने शिवजयंती साजरी.

    घोटी येथे वक्तृत्व स्पर्धा आणि गुणवंतांच्या सत्काराने शिवजयंती साजरी.

    बेंबळे प्रतिनिधी
    गुरुवार दि. १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या निमित्ताने डी.जे डाँल्बीला फाटा देऊन शिवरायांचे विचार घराघरात पोहचवण्यासाठी घोटीतील मध्यवर्ती शिवजन्मोत्सव मंडळाच्या वतीने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये जवळपास ३० ते ३५ स्पर्धकांनी सहभाग नोंदवुन शिवरायांची शौर्यगाथा मांडण्याचा प्रयत्न केला.
    स्पर्धेदरम्यान बेंबळे येथीन कु. गौरी बंडू अवताडे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत कृषी विभात क्लास टू अधिकारी म्हणूनृ निवड झाल्याबद्दल घोटी ग्रामस्थांच्या वतीने तीचा सत्कार करण्यात आला.
    वक्तृत्व स्पर्धेमध्ये नंबर आलेल्या मुलां-मुलींना रोख स्वरुपात बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण काळभोर गुरुजी आणि जीवराज पाटील यांनी केले तर या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवश्री.महादेव पवार यांनी केले आणि आभार प्रदर्शन यादव गुरुजींनी केले.
    यावेळी ॲड महेशजी शिंदे, सौदागर बागल, शांतीलाल शहा, कैलास कणसे, घोटी गावचे युवानेते राजाभाऊ बागल, संभाजी ब्रिगेड सोलापूर जिल्हा प्रवक्ते संतोषजी शिंदे सरपंच विजय पवार, माजी सरपंच शिवश्री.डाँ संजय वणवे, ग्रामसेवक माळी भाऊसाहेब, आप्पासाहेब गोडसे ,रामभाऊ भोसले, नवनाथ आल्हाट ,सुरज भोसले ,पवनकुमार गळगुंडे,बाळूकाका कुलकर्णी,बाळासाहेब जाधव ,तानाजी मदने, दिपक शेटे ,अमरजीत कणसे, तानाजी केदार, सुचित लोंढे ,राहुल वायदंडे ,सुजित खंडागळे, आदि मान्यवरांसह ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते

  • महात्मा फुले ज्युनिअर कॉलेज चे जेईई मेन्स (JEE MAINS) परीक्षेत घवघवीत यश  ग्रामीण भागातील सुप्रिया अटकळे, प्रथमेश गवळी, दत्तात्रय भानवसे यांच्या सह चार विद्यार्थी जेईई अँडव्हान्सड (JEE Advanced) परीक्षेसाठी साठी पात्र

    महात्मा फुले ज्युनिअर कॉलेज चे जेईई मेन्स (JEE MAINS) परीक्षेत घवघवीत यश ग्रामीण भागातील सुप्रिया अटकळे, प्रथमेश गवळी, दत्तात्रय भानवसे यांच्या सह चार विद्यार्थी जेईई अँडव्हान्सड (JEE Advanced) परीक्षेसाठी साठी पात्र

    महात्मा फुले ज्युनिअर कॉलेज चे जेईई मेन्स (JEE MAINS) परीक्षेत घवघवीत यश

    ग्रामीण भागातील सुप्रिया अटकळे, प्रथमेश गवळी, दत्तात्रय भानवसे यांच्या सह चार विद्यार्थी जेईई अँडव्हान्सड (JEE Advanced) परीक्षेसाठी साठी पात्र.

    बेंबळे प्रतिनिधी फोटो

    टेंभुर्णी: ज्ञानदीप शिक्षण संस्था टेंभुर्णी संचलित, महात्मा फुले ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स २०२६ (सेशन 1) परीक्षेत चमकदार कामगिरी करत कॉलेजच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. लातूर, पुणे आणि कोटा येथील नामांकित संस्थांप्रमाणेच आता ग्रामीण भागातील टेंभुर्णीमध्येही दर्जेदार शिक्षण उपलब्ध होत असल्याचे महात्मा फुले ज्युनिअर कॉलेज च्या या निकालाने सिद्ध केले आहे. या परीक्षेत महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी यश संपादन केले असून, विद्यार्थ्यांनी उच्चांकी गुण मिळवले आहेत. ग्रामीण भागातील सुप्रिया अटकळे, प्रथमेश गवळी, दत्तात्रय भानवसे यांच्या सह चार विद्यार्थी जेईई अँडव्हान्सड (JEE Advanced) परीक्षेसाठी साठी पात्र झाले आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांचे व महात्मा फुले ज्युनिअर कॉलेज चे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सुप्रिया सोमनाथ अटकळे हिने फिजिक्समध्ये ९५.०९ पर्सेंटाईल आणि केमिस्ट्रीमध्ये ९२.४३ पर्सेंटाईल व एकूण पी सी एम मध्ये ९३.२१ पर्सेंटाईल मिळवले आहेत. प्रथमेश दत्तात्रय गवळी याने फिजिक्समध्ये ९६.९७ पर्सेंटाईल व एकूण पी सी एम मध्ये ९१.०१ पर्सेंटाईल मिळवले आहेत. दत्तात्रय सोमनाथ भानवसे याने फिजिक्समध्ये ९५.०९ पर्सेंटाईल मिळवत एकूण पी सी एम मध्ये ९०.४९ पर्सेंटाईल मिळवले आहेत. हे सर्व विद्यार्थी महात्मा फुले ज्युनिअर कॉलेजचे नियमित विद्यार्थी होते.
    ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत मिळवलेले हे यश कौतुकास्पद आहे. या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नारायण भानवसे सर, प्राचार्य विजय यादव सर, मुख्याध्यापक शोएब बागवान सर, मार्गदर्शक शिक्षक श्री अक्षय लोंढे सर, सौ सोनाली गवळी मॅडम, श्री संदीप लोंढे सर शिक्षक पालक संघ, संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ यांचेकडून सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन करण्यात आले.

    (चौकट)
    ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असते. त्यांना योग्य दिशा मिळाली, तर ते पुणे, लातूर किंवा कोटा येथील विद्यार्थ्यांच्या तोडीस तोड कामगिरी करू शकतात, हे आमच्या विद्यार्थ्यांनी ‘जेईई मेन्स’च्या निकालातून सिद्ध केले आहे, अनेकदा ग्रामीण भागातील मुलांना मोठ्या शहरात जाऊन शिक्षण घेणे आर्थिकदृष्ट्या शक्य नसते. हीच उणीव भरून काढण्यासाठी आम्ही टेंभुर्णीत JEE/NEET व MHT-CET चे वर्ग सुरू केले आहेत, ज्याचा फायदा आज या गुणवंत विद्यार्थ्यांना झाला आहे. हे यश विद्यार्थ्यांच्या कष्टाचे, शिक्षकांच्या प्रयत्नांचे तर पालकांच्या विश्वासाचे आहे.

    नारायण भानवसे सर (संस्थापक अध्यक्ष)

  • बेंबळे येथे शिवजन्मोत्सव  उत्साहात संपन्न

    बेंबळे येथे शिवजन्मोत्सव उत्साहात संपन्न

    बेंबळे येथे शिवजन्मोत्सव उत्साहात संपन्न.

    बेंबळे प्रतिनिधी फोटो
    १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९६ व्या जयंती निमित्त येथील छत्रपती चौकातून सकाळी नऊ वाजता शेकडो शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये हलग्या आणि सनई चौघड्यांच्या निनानादात गावातुन नगर प्रदक्षिणा घालून छत्रपती शिवाजी महारांजांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकी नंतर छत्रपती चौक येथे समस्त ग्रामस्थांच्या वतीने महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी बालशिवभक्त शैलेश संतोष शिंदे याने शिवगर्जना म्हणून उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. यावेळी बोलताना बालव्याख्याते शैलेश शिंदे यांनी निर्भिडपणे छत्रपतींचा धगधगता इतिहास सांगताना आजच्या तरुणाईला छत्रपती शिवरायांप्रमाने निर्व्यसनी, चारित्र्यसंपन्नतेने वागण्याचा संकल्प करण्याचे आवाहन करुन उपस्थितांची मने जिंकली. याप्रसंगी प्रसिद्धी वाडकर हिने शिवचरित्राबाबत आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा.संतोष शिंदे यांनी केले. या कार्यक्रमासाठी समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    सायंकाळी सात वाजल्यापासून बँजो, हलगी या वाद्यांच्या गजरात भव्य अशा शिवप्रतिमेच्या मिरवणूकीचेही आयोजन केले होते.यामध्ये शेकडो शिवभक्त मोठ्या उत्सहाने मिरवणूकीत सहभागी होऊन अष्टगंधाची मुक्तपणे उधळण करीत देहभान विसरुन महाराजांच्या मिरवणूकीत आनंदाने नाचत होते. रात्री दहा वाजता शिवरायांची आरती करुन मिरवणूकीची सांगता करण्यात आली. शिवजयंतीचा हा सोहळा उत्साहाने पार पाडण्यासाठी बेंबळे आणि पंचक्रोशीतील सर्वच शिवभक्तांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.

  • विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध.

    विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध.

    बेंबळे प्रतिनिधी

    माढा तालुक्यातील पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक 2026/2031 बिनविरोध पार पडली असून एकूण 21 संचालकांच्या जागेसाठी 23 उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून यातील दोन अर्ज पूरक म्हणून भरले आहेत ,त्यामुळे इतर सर्व 21 संचालकांची बिनविरोध निवड झालेली असून त्यांची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.
    वृत्तांत असा की माढा तालुक्यातील पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार बबनराव शिंदे यांचे कुशल नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली मागील 25 वर्षातील संचालक मंडळाची ही पाचवी पंचवार्षिक निवडणूक असून मागील चार पंचवार्षिक निवडणुकाप्रमाणे ही निवडणूक देखील बिनविरोध झालेली आहे. जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह बबनराव शिंदे यांच्या कुशल नेतृत्व आणि अधिपत्याखाली ही निवडणूक पार पडली असून यामध्ये जुन्या व नव्या संचालकांचा समावेश करण्यात आलेला दिसून येत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कुर्डूवाडी उपजिल्हाधिकारी जयश्री आव्हाड यांनी काम पाहिले ,
    संचालकांची नावे याप्रमाणे…
    1) बबनराव विठ्ठलराव शिंदे, निमगाव टे.
    2) पोपट दिगंबर गायकवाड, रिधोरे
    3) पोपट बलभीम चव्हाण ,घोटी
    4) अमोल सौदागर चव्हाण, उंदरगाव
    5) विक्रमसिंह बबनराव शिंदे, निमगाव टे.
    6) पंडितराव वसंतराव पाटील ,खैराव
    7) विलास महादेव कौलगे ,अंजनगाव (उमाटे)
    8 ) नीलकंठ भगवान पाटील ,मानेगाव
    9 )अशोक विश्वनाथ मिस्कीन ,चव्हाणवाडी टे. 10) विलास कमलाकर तोडकरी, मोडनिंब
    11) सचिन कल्याणराव देशमुख, आलेगाव
    12) रमेश व्यंकटराव येवले- पाटील, टेंभुर्णी
    13) राजेश विश्वंभर खोत, वेताळवाडी
    14 )संजय सुधाकर लोकरे , लवूळ
    15 )श्रीकांत दिलीप पाटील, बावी
    16) रणजीतसिंह बबनराव शिंदे, निमगाव टे. (सहकारी संस्था )
    17) लाला मारुती मोरे (एससी /एसटी)
    18) राजाराम निवृत्ती थोरात, टेंभुर्णी( एनटी) 19 )राजाराम मनोहर नाळे, वेणेगाव (ओबीसी) 20) सुशीला सुरेश चौगुले, अंजनगाव (खे.) (महिला)
    21 )निलावती पांडुरंग घाडगे, टाकळी टे.( महिला)
    22) जितेंद्र रामहरी गायकवाड, गार अकोले (ओपन)
    23 )सिंधुताई सुभाष नागटिळक कुंभेज (महिला)
    या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 26 होती, अर्जाची छाननी 19 फेब्रुवारी रोजी होणार असून 20 फेब्रुवारी अर्ज माघारी घेणे आहेत व त्याच दिवशी सर्व पात्र उमेदवारांची अधिकृत यादी प्रसिद्ध होणार आहे.
    या निवडणुकीबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह बबनराव शिंदे म्हणाले की संचालक मंडळामध्ये जुन्या व नव्यांचा समावेश करून समन्वय साधला आहे, यापूर्वीच्या सर्व संचालकांनी आजपर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आम्ही व्यक्तिशः ऋणी आहोत व आभार व्यक्त करतो. नवीन संचालकांचे पुढील कार्यकालासाठी चांगले सहकार्य मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आणि विश्वास आहे. निवडणूक निर्णय अधिकारी कुर्डूवाडी च्या उपजिल्हाधिकारी जयश्री आव्हाड यांनी निवडणुकीमध्ये सर्वांनी योग्य प्रकारे दिलेल्या सहकार्याबद्दल सर्वांना धन्यवाद व्यक्त केले .

  • अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या परमात्म्याचे सतत स्मरण ठेवा..              ……..   बीके शिवरात्रीबहेन

    अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या परमात्म्याचे सतत स्मरण ठेवा.. …….. बीके शिवरात्रीबहेन

    बेंबळे प्रतिनिधी फोटो

    टेंभुर्णी येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विद्यालयाच्या सेवा केंद्रामध्ये महाशिवरात्र उत्साहाने साजरी करण्यात आली. याप्रसंगी ब्रह्माकुमारी अकलूज सेंटरच्या प्रमुख शिवरात्री बहेन, टेंभुर्णीच्या अनिता बहेन ,सायली बहेन तसेच जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजीत सिंह शिंदे, प्रणिताताई शिंदे नूतन जिल्हा परिषद सदस्या सविता कोकाटे प्रकाश आप्पा पाटील संजीवनी आरबोले, रमेश पाटील, बाबूगिरी गोसावी ,मार्केट कमिटीचे संचालक दादासाहेब देशमुख आदी प्रमुख प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
    याप्रसंगी अकलूज सेंटरच्या प्रमुख संचालिका शिवरात्री बहेन म्हणाल्या की सध्या कलियुगी दुनियेमध्ये सर्वत्र अज्ञानाचा अंधकार पसरला आहे , क्रोध हा विकार 108 स्नायू कमजोर करण्याचे काम करतो, यासाठी स्वतःमध्ये शांती आणण्याचा प्रयत्न करा आणि त्यासाठी दररोज नियमित सकाळी किमान दहा मिनिट तरी राजयोग करून परमात्म्याचे अंतकरणापासून स्मरण करा, मी आणि माझे सोडून द्या कारण प्रत्येकजण ईश्वराने आपापल्या ठिकाणी परफेक्ट बसवलेला आहे, कोणतेही काम करताना ‘मी’ केले यापेक्षा परमात्म्या सतत माझ्याबरोबर असून माझ्याकडून ते हे कार्य करून घेत आहे ही भावना ठेवा आणि अनुभूती घ्या. प्रत्येक दिवशी अमृतवेळेला पहाटे काही क्षण राज योगाच्या माध्यमातून परमात्म्याची संपर्क साधा आणि जीवनात शांतीचा अनुभव घ्या आणि हे सर्व ब्रह्माकुमारी सेंटरमध्ये मोफत शिकवले जाते हे लक्षात असू द्या, शिव परमात्मा सदैव कल्याणकारी आहे तो अकल्याण करत नाही परंतु सध्याची ही सर्वांसाठी मोठ्या परीक्षेची वेळ आहे ,अज्ञानाचा अंधकार सर्वत्र पसरलेला आहे ,आई-वडील मुलावर संस्कार करतात त्याला लहानाचा मोठा करतात आणि साक्षी होऊन त्याचं कर्तृत्व पाहतात मग परमात्मा हा सर्व आत्म्याचा पिता आहे तोही तुम्हाला तुमचे प्रत्येक कृत्य यशस्वी करण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे प्रथम त्या शिव परमात्म्याची आठवण ठेवा आणि काम क्रोध अहंकार लोभ मत्सर याचा त्याग करा .आपण नियमित मेडिटेशन करून परमात्म्याचे ज्ञानभोजन असलेल्या मुरलीतील महावाक्याचे स्मरण ठेवल्यास जीवन यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. बहेनजी पुढे म्हणाल्या की शिवरात्री ही परमात्म्याची जयंती आहे आज आपण शिवाच्या पिंडीवर धोत्र्याचे विषारी फुल वाहतो म्हणून आज आपण सर्वजण परमात्म्याला काम क्रोध लोभ अहंकार मत्सर ही विषारी फुले वाहू, तो स्वीकारण्यास तयार आहे व त्यानंतर आपले जीवन सुखी समाधानी शांत आणि वैभव संपन्न होण्यास परमात्मास मदत करतो याचा अनुभव घेणं महत्त्वाचं आहे. यासाठी दिवसातील फार थोडा वेळ आपण दिला पाहिजे हे निश्चित. ईश्वराच्या स्मृतित दिवसाची सुरुवात करा, कोणताही संघर्ष अथवा कोणतीही समस्या पार करण्यासाठी ईश्वर आपणास साथ देईल. निंदक हे आपले डॉक्टर असतात कारण आपण आजारी असतो औषध इंजेक्शन आपणच घेतो पण बिल मात्र डॉक्टर ला द्यावे लागते त्याप्रमाणे निंदक आपली निगेटिव्हिटी प्रसिद्ध करण्यास तत्पर असतात ज्यामुळे आपणाला टेन्शन येते परंतु आपण नकारात्मक विचार संपूर्णपणे सोडून द्या आणि शांत रहा नंतर पहा या डॉक्टरांचा आपल्याला किती फायदा होतो. आपण म्हणजे परमात्म्याची शक्ती आहोत आणि ही शिवशक्ती एकत्र आहे, निंदकलोक जीवनात ‘सेट’ असलेल्याला ‘अपसेट’ करण्याचे काम करतात परंतु आपण परमात्म्यावर विश्वासून राहून परफेक्ट बनलं पाहिजे. जे चांगले असेल ते घ्या कारण मोबाईल मध्ये सध्या अतिशय चांगल्या फायदेशीर गोष्टी आहेत परंतु तेवढ्याच वाईटही आहेत असेही शिवरात्री बहेनजीनी मार्गदर्शन करताना सांगितले
    सर्वप्रथम टेंभुर्णीच्या संचालिका अनिता बेहेनजी यांनी मुरली वाचन केले व नंतर आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगून सर्व मान्यवरांचे स्वागत केले , दीप प्रज्वलन व मान्यवरांच्या शुभ हस्ते शिवशध्वजारोहण करण्यात आले . रणजीत सिंह शिंदे व सविता ताई कोकाटे यांनीही आपले समयोचित विचार व्यक्त करून प्रजापिता ब्रह्माकुमारी गीता पाठ शाळेत मिळणाऱ्या ज्ञानामुळे एक आध्यात्मिक परिवर्तन होऊन समाजामध्ये सकारात्मक विचार प्रवृत्ती निर्माण होण्यास मदत होते असे प्रतिपादन केले व आम्हाला या आध्यात्मिक संस्थे बद्दल सदैव आदरयुक्त भावना असून लौकिक कोणतीही समस्या आली तर आम्ही आपणास सर्वतोपरी सहकार्य करू असेही सांगितले. या कार्यक्रमास बेंबळे शिराळ भिमानगर पिंपळनेर अकोले व परिसरातील अनेक नागरिक बंधू भगिनी मुद्दामहून उपस्थित होते ,कार्यक्रमा नंतर सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.

  • गौरी अवताडे हिची कृषी अधिकारी पदावर निवड ….

    गौरी अवताडे हिची कृषी अधिकारी पदावर निवड ….

    बेंबळे/ प्रतिनिधी फोटो

    महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेमध्ये बेंबळे येथील गौरी बंडू अवताडे हिचे राज्य शासनाच्या कृषी विभागामध्ये क्लास-2 ऑफिसर म्हणून निवड झालेली आहे. गौरी अवताडे हिचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण येथील अवताडे वस्ती शाळेत, पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण विमलेश्वर विद्यालयांमध्ये, अकरावी- बारावी शिक्षण बारामती येथील शारदाबाई पवार महाविद्यालयात तर बीएससी ऍग्री पदवीपर्यंतचे शिक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठ पुणे येथे झाले आहे .
    पहिल्यापासूनच गौरी अवताडे ही हुशार विद्यार्थिनी म्हणून ओळखली जाते ,तीने बारावी आणि कृषी पदवी मध्ये डिस्टिंक्शन मिळवले आहे ,तर एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षेत उज्वल यश संपादन केले आहे .तिचे वडील बंडू अवताडे हे येथील विमलेश्वर विद्यालयामध्ये शिक्षक आहेत, तसेच यापुढे केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा देण्याची गौरीची मानसिकता व महत्त्वाकांक्षा आहे.
    जिद्द, चिकाटी, परिश्रम व चौफेर अभ्यासू वृत्तीमुळे ग्रामीण भागातील वस्ती शाळेत शिक्षण घेतलेली गौरी ही आज कृषी अधिकारी पदावर पोहोचली आहे. त्यामुळे सर्वांनाच अभिमानास्पद बाब असून सर्व थरातून तिचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

  • 21 ते 31 जानेवारी पर्यंतचे ऊस बील जमा….  31 जानेवारी अखेर ऊस बिलासाठी 544 कोटी 21 लाख रुपये शेतकऱ्यांना केले अदा   मा.आ.बबनराव शिंदे

    21 ते 31 जानेवारी पर्यंतचे ऊस बील जमा…. 31 जानेवारी अखेर ऊस बिलासाठी 544 कोटी 21 लाख रुपये शेतकऱ्यांना केले अदा मा.आ.बबनराव शिंदे

    बेंबळे प्रतिनिधी फोटो

    विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब या कारखान्याचे 21 ते 31 जानेवारी या दहा दिवसाचे प्रति टन रू.3025/-प्रमाणे पहिला हप्ता ऊस बील सभासद, ऊस पुरवठादार यांचे बँक खात्यात जमा करणेत आले आहे अशी माहिती कारखान्याचे संस्थापक चेअरमन मा.आ.बबनराव शिंदे यांनी दिली.

    अधिक माहीती देताना मा.आ.बबनराव शिंदे म्हणाले, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब या कारखान्याचा सन 2025-26 चा गाळप हंगाम जोमाने सुरू आहे. या हंगामात युनिट नं.1 पिंपळनेर कडे सरासरी प्रतिदिन 14700 मे.टन व युनिट नं.2 करकंब कडे सरासरी 5000 मे.टन पेक्षा जादा गाळप होत आहे. आजअखेर युनिट नं.1 कडे 14 लाख 52 हजार 484 मे.टन व युनिट नं.2 कडे 5 लाख 01 हजार 921 मे.टन असे एकूण 1954405 मे.टन गाळप झालेले आहे. 21 ते 31 जानेवारी या दहा दिवसाचे प्रति टन रू.3025/-प्रमाणे पहिला हप्ता ऊस बील सभासद व ऊस पुरवठादार शेतक-यांच्या खात्यात जमा करणेत आले. या ऊस बिलासाठी 61 कोटी 50 लाख अदा केलेले आहेत. 31 जानेवारी अखेर ऊस बिलासाठी एकूण 544 कोटी 21 लाख अदा करणेत आलेले आहेत.

    युनिट नं.1 व 2 कडील सन 2025-26 गाळप हंगामातील गाळपाचे उदिद्षपुर्तीसाठी सभासद व ऊस पुरवठादारांनी त्यांचा सर्व ऊस विठ्ठलराव शिंदे कारखान्यास पुरवठा करून गाळप हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन मा.आ.शिंदे यांनी केले.

  • माढा मतदार संघातील थांबलेल्या विकासाचा ‘रथ’ पुढे चालू ठेवण्यासाठी भा. ज. प.च्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा…. रणजितसिंह शिंदे यांचे आव्हान ….. या निवडणुकीत लबाड लोकप्रतिनिधीने जनतेला वाऱ्यावर सोडून दिले:  …आता जनता त्याची जागा

    माढा मतदार संघातील थांबलेल्या विकासाचा ‘रथ’ पुढे चालू ठेवण्यासाठी भा. ज. प.च्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा…. रणजितसिंह शिंदे यांचे आव्हान ….. या निवडणुकीत लबाड लोकप्रतिनिधीने जनतेला वाऱ्यावर सोडून दिले: …आता जनता त्याची जागा

    बेंबळे प्रतिनिधी फोटो

    मागील दीड वर्षांपूर्वी जनतेला खोटे बोलून संभ्रम निर्माण करणारी खोटी आश्वासने देऊन लोकप्रतिनिधित्व मिळवलेल्या आमदारामुळे दीड वर्षात माढा मतदारसंघाचा विकास पूर्णपणे थांबलेला स्पष्ट दिसून येत असून जनतेचा या लबाड आणि भामट्या आमदाराबद्दल पूर्ण भ्रमनिरास झालेला आहे म्हणून या मतदारसंघात ‘थांबलेल्या विकासाचा रथ’ यशस्वीपणे पुढे चालू ठेवून आपल्या गावातील भागातील व तालुक्यातील तमाम जनतेला सुखी समृद्धी आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी सर्वांगीण विकासाचे व्हिजन समोर ठेवून देशात व राज्यात यशस्वीरित्या वाटचाल करत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व गट व गणातील उमेदवारांना कमळ चिन्हा पुढील आपले बहुमोल मत देऊन मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आव्हान जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजीत सिंह शिंदे यांनी केले आहे.
    याप्रसंगी अधिक बोलताना रणजीत सिंह शिंदे म्हणाले की सर्वत्र खोटे पण रेटून बोलून लोकांची मते मिळवून झालेले आमदार मागील दीड वर्षात माजी आमदार बबनदादा शिंदे यांनी मंजूर करून आणलेली कामे मीच केली आहेत व असे म्हणून सर्वत्र उद्घाटन करत फिरत आहेत पण हे म्हणजे *’मेहनत करे मुर्गा अंडा खाए फकिर’* हा प्रकार आहे.
    विधानसभा निवडणुकीपूर्वी उसाला 3500 रुपये प्रति टन दर देतो म्हणाले आणि आता या निवडणुकीपूर्वी यातील शंभर रुपये दर त्यांनी जाहीर केला व ते आता आम्हाला म्हणत की तुम्ही दोनशे रुपये जादा द्या पण त्यांची ही मतदानाच्या अगोदर दोन दिवसाची घोषणा म्हणजे सर्व मतदारांची नवीन प्रकारे दिशाभूल करण्याचा प्रकार आहे परंतु ‘लबाडाचे आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं’ हे आता जनतेने पूर्ण ओळखले आहे. उसाच्या दराच्या बाबतीत आम्ही जे बोलतो तेच करतो, महाराष्ट्रात फक्त विठ्ठलराव शिंदे कारखाना शेतकऱ्यांना दहा दिवसाला ऊस बिल देतो हे राज्य पातळीवर देखील सर्वांना माहीत आहे. आमदार म्हणतात खैराव मानेगाव योजना मीच करत आहे … असे विचारले असता यावर रणजीत सिंह शिंदे म्हणाले की या व्यक्तीला या योजनेची काहीही माहिती नाही. सीना नदीतील बंधाऱ्यातील पाण्यावर ठिबक सिंचन मुळे वापरलेल्या पाण्यानंतर नंतर शिल्लक राहिलेले पाण्यातून ही योजना बबन दादांनी तीन वर्षांपूर्वी मंजूर करून घेतलेली आहे. या योजनेसाठी निधी मिळावा म्हणून आम्ही मंत्रालयात बैठका लावल्या होत्या व त्यानुसार जलसंपदा मंत्री आणि पालकमंत्री यांनी या योजनेस साडेतीनशे कोटी रुपये निधी देण्याचे मान्य केले आहे, यामुळे खैराव कापसेवाडी विठ्ठलवाडी मानेगाव हटकरवाडी या व इतर ठिकाणच्या पाच हजार एकर लाभक्षेत्राला पाणी मिळणार हे निश्चित. मात्र हा भामटा आमदार माझ्यामुळेच हे सगळं होत आहे असा खोटा नरेटिव्ह सर्वत्र पसरवत आहे पण “पब्लिक सब जानती है”,या माणसाच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला आता कोणीही तयार नाही.
    माढा तालुक्याच्या पूर्व भागात सीना नदीकाठच्या लोकांना महापूराचे फार मोठे संकट आले, आमदार अभिजीत पाटील म्हणतात मीच माणसं वाचविली आणि मदत केली यावर आपलं काय म्हणणं आहे असे विचार रणजीत सिंह शिंदे म्हणाले की या महापुरामध्ये एक लाख 29 हजार पूर ग्रस्ताना नाष्टा चहा जेवण पुरवण्याचे काम विठ्ठलराव शिंदे कारखाना आणि केवड येथील बबनराव शुगर साखर कारखाना अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले हे सगळ्या जनतेला माहीत आहे. हजारो लोकांना माढा येथे शाळेमध्ये आश्चर्य दिला, आरोग्य सेवेसाठी अनेक ठिकाणी सोयी केल्या, पूर ओसरल्यानंतर गावोगावी घराघरातून जीवनावश्यक अन्नधान्य-शिधा असलेली किट्स वाटप केले परंतु आम्ही कधी याचा बोभाटा केला नाही. परंतु महापुराच्या पाण्यातून माणसे सोडवण्यासाठी हेलिकॉप्टर जिल्हाधिकारी यांनी मागवले आणि ते आले असताना त्याची रील’ काढून स्वतःला त्यामध्ये दाखवून मी कसा करतो बघा हे दाखवण्याचा केवीलवाणा प्रयत्न आमदार महाशयाने केला, त्याचप्रमाणे पूरग्रस्तांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा दौरा जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आयोजित करण्यात आला परंतु मुख्यमंत्र्यांच्या पुढे पुढे करून मी किती कर्तबगार आहे हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न झाला पण दुर्दैवाने पूरग्रस्त गावातील जनतेने या आमदार महोदयांचा हा प्रयत्न हाणून पाडला. अनेक सामाजिक संस्था मार्फत पूरग्रस्तांना मदतीचे वाटप करण्यात आले परंतु हे आमदार महाशय काही ठिकाणी जाऊन आपणच हे देत आहोत असा विभव आणून फोटो आणि रील काढत होते हे अतिशय निंदनीय कृत्य हे महाशय करत होते. पूरस्थिती नंतर या भागातला ऊस प्राधान्याने गळितास नेला, या भागातील शेतकऱ्यांना साखर कारखान्यातर्फे सर्वतोपरी मदत केली परंतु आम्ही कशाचीही रील्स काढली नाहीत कारण महापूरच संकट फार मोठं होतं आणि याची प्रसिद्धी देणं हे या दुःखी अवस्थेतील माणसांचा अपमान करण्यासारखा आहे असा आम्हाला वाटतं आणि अखेर ही माणसं आदरणीय बबनदादा यांचे वर प्रेम करणारी आमची अंतकरणातली माणसं होती .
    सीना माढाला दिलेला वीस लाखाचा चेक खोटा आहे असे आमदार म्हणतात… असे विचारता रणजीत सिंह शिंदे म्हणाले की आपण स्वतः फोन करा आणि पाटबंधारे कार्यालयात चेक ‘पास’ झाला का नाही हे पहा …. जनतेचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे,आम्हाला याच्या इतकं खोटं कधी बोलता येत नाही, ‘हा आमदार आहे का ‘रायरंद’ आहे हेच आता जनतेला कळनासे झाले आहे, खोटं पण रेटून बोलून जनतेचे मनोरंजन करणे म्हणजे विकास करणे हे या महाशयाचे धोरण आता जनतेने पूर्ण ओळखले आहे. आम्ही कधीच खोटे आर्थिक व्यवहार करत नाही परंतु आमदार अभिजीत पाटील यांनी मात्र पंढरपूरच्या विठ्ठल कारखान्यामध्ये किती कोटीची सभासदांची फसवणूक केली …. हे आगामी काही दिवसातच निश्चित जनतेच्या समोर येईल एवढे मात्र आम्ही विश्वासाने सांगू शकतो.
    …. मी सीनामाढा सिंचन योजना कधीच बंद पडू देणार नाही असे म्हणणारे आमदार फक्त या ठिकाणी जाऊन स्वतःचे रील काढून सोशल मीडियावर फोटो वायरल करतात… बाकी सगळी कामे विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे कर्मचारी व अधिकारी मागील 23 वर्षापासून करत आहेत व पुढेही आम्ही तेच करणार आहोत, कारण माढा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या 55 हजार एकरातील पिकांचे नुकसान होऊ नये ही या मागची आमची तळमळीची भूमिका आहे. या योजनेसाठी पंढरपूरच्या विठ्ठल कारखान्याकडून हा माणूस काहीही मदत देणार नाही हे त्याच्या खोटारड्या वागण्यावरून दिसून येत आहे.
    मागील तीस वर्षातील विकास कामा विषयीच्या संदर्भात रणजितसिंह शिंदे म्हणाले की ह्या भामट्याला सांगा सीना माढा सिंचन योजना, विठ्ठलराव शिंदे पिंपळनेर व करकंब असे दोन कारखाने, केवडचा / तुर्कपिंपरी चा साखर कारखाना, रस्ते, तसेच मोठे वीज केंद्र,3 एमआयडीसी, शाळा ,कॉलेज, पाणीपुरवठा योजना, गाव गावच्या अनेक सोयी सुविधा, आरोग्य केंद्रे हे सर्व कुणी केलं….? हे जनताच त्याला सगळं दाखऊन देत आहे, त्याला वाटते जनता वेडी आहे पण त्यांने एकदा फसवलंय… आता यापुढे याला जनता फसणार नाही व या जि.प.पं.स. निवडणुकीत त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असेही शिंदे यांनी मत व्यक्त केले.
    या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आमदार पाटील महाशयानी सर्वसामान्य जनतेला वाऱ्यावर सोडलय ….कारण या माध्यमातून सामान्य लोकांच्यासाठी समाविष्ट असलेल्या गावातील प्रतिनिधी निवडला जातो हे याला माहीतच नाही असे दिसते…. मतदार संघातील 70 टक्के गावांमधून हे आमदार प्रचाराला गेलेच नाहीत …सर्वसामान्य जनतेला यांनी पूर्णपणे वाऱ्यावर सोडले आहे हे सिद्ध होते , आणि ज्या ठिकाणी सभेसाठी गेलाय त्या ठिकाणी स्वतःच्या गाड्यांतून भाड्याने आणलेली माणसं बसवायची… काहीतरी बोलले की टाळ्या आणि शिट्ट्या मारायच्या आणि सगळीकडे सोशल मीडियातून एवढाच भाग पसरवायचा… असले भूलभुलय्याचे काम करायचे …पण ऐकणारी जनता एवढी वेडी नाही हे याला या निवडणुकीच्या निकालानंतर कळेल.
    शिंदे यांच्या पक्षनिष्ठे बद्दल काय? असे आमदार म्हणतात… यावर रणजितसिंह शिंदे म्हणाले की आम्ही मतदार संघाच्या विकासासाठी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे परंतु हा माणूस सकाळी एका पक्षा कडे, दुपारी दूसऱ्याच पक्षात दिसतो आणि रात्री तिसऱ्याच पक्षाकडे जातो आणि प्रत्येक ठिकाणी पोकळ मोठेपणाची भाषणे ठोकतो… ..’हा नेमका आहे तरी कोणाचा…’? त्यामुळे एवढे निश्चित की याला आता जनतेने नाकारायचं ठरवलेलं आहे हे नक्की.
    आपण माढा तालुक्यातील पाच जिल्हा परिषद गटात भाजपचे उमेदवार आणि भोसरे आणि कुर्डू या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ चिन्हाचा प्रचार करत आहात हे कसे…? असे विचारता रणजीत शिंदे म्हणाले की माढा तालुक्यातील भोसरे आणि कुर्डू हे दोन मतदारसंघ करमाळा तालुक्यामध्ये संजय मामांच्या मतदार संघात येतात ,आणि संजय मामा शिंदे हे अजित दादांचे कट्टर समर्थक असून या दोन्ही गटातून घड्याळ चिन्हावरती त्यांचे प्रतिनिधी निवडणूक लढवत आहेत तसेच संजय मामांची आणि भारतीय जनता पक्षाची करमाळा तालुक्यात युती आहे… त्यामुळे पर्यायाने आम्ही देखील संजय मामांच्या घड्याळाचा प्रचार करतो व त्यांच्याच उमेदवारांना मतदान करून विजयी करणार हे निश्चित.
    .. बबन दादांनी आणि तुम्ही कै.अजित दादांना श्रद्धांजली वाहिली नाही असे प्रचार सभेत हे आमदार सांगतात… याबद्दल विचारले असता रणजीत शिंदे म्हणाले की कै.अजितदादा हे अतिशय महान व्यक्तिमत्व होते, त्यांच्या आणि आमच्या शिंदे घराण्याचे खूप जुने संबंध आहेत,.कै. अजितदादांनी आदरणीय बबनदादांना माढा तालुक्याच्या विकास कामांमध्ये मोलाचे सहकार्य केले आहे हे आम्ही कधीच विसरू शकत नाही, त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे.. मला एवढंच सांगायचंय की 28 जानेवारी रोजी अजित दादांच्या निधनानंतर 29 जानेवारीचा *”दैनिक पुण्यनगरी”*अंक पाहिल्यास बबन दादा आणि मी आमच्या दोघांची कै. अजित दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेल्या बातम्या तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे आमदाराच्या बोलण्याला फारसं महत्व द्यायची गरज नाही . “सोशल मीडियावर ऍक्टिव्ह परंतु ग्राउंड लेव्हलला निष्फळ” ठरलेला असा हा फसवा आणि खोटारडा लोकप्रतिनिधी आहे आणि त्याच्या बोलण्याला या निवडणुकीत जनता आता फसणार किंवा भूलणार नाही हे या निवडणुकीच्या निकालानंतर सर्वांना दिसून येईल.
    या निवडणुकीनिमित्त मतदारांना काय संदेश आहे ….असे विचारले असता रणजीत शिंदे म्हणाले की देशात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे आपल्या मतदार संघाच्या विकास कामात आपल्याला पूर्ण सहकार्य मिळत आहे .त्यामुळे माढा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील उमेदवारांच्या कमळ चिन्हा पुढे आपले मतदान करून मतदार संघाची थांबलेली विकासाची वाटचाल पुढे नेण्यासाठी तमाम मतदार बंधू-भगिनींनी पूर्ण सहकार्य करावे असे मी नम्रपणे आव्हान करतो आणि मला खात्री आहे की लोकसभा आणि विधानसभा मध्ये केलेली चूक यावेळी माढा तालुक्यातील स्वाभिमानी आणि जागृत असलेला मतदार करणार नाही या बद्दल विश्वास वाटतो.

  • रणजितसिंह शिंदे यांनी सीना-माढाचे थकीत  वीजबिलाच्या रकमेचा चेक (धनादेश) संबंधितांच्या कडे केला सुपूर्त… …सीना माढा सिंचन योजनेचे आवर्तन  सुरु… ….40हजार एकर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना आनंद व समाधान … …..’दैनिक पुण्यनगरी’ च्या पाठपुराव्याला यश  ….

    रणजितसिंह शिंदे यांनी सीना-माढाचे थकीत वीजबिलाच्या रकमेचा चेक (धनादेश) संबंधितांच्या कडे केला सुपूर्त… …सीना माढा सिंचन योजनेचे आवर्तन सुरु… ….40हजार एकर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना आनंद व समाधान … …..’दैनिक पुण्यनगरी’ च्या पाठपुराव्याला यश ….

    बेंबळे मुकुंद रामदासी

    सीना माढा सिंचन योजनेचे 73 लाख रुपये वीज बिल थकल्यामुळे ही योजना यावर्षी कार्यान्वित होती का नाही ? असा प्रश्न निर्माण झाला होता आणि चाळीस हजार एकर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते ,परंतु सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष तथा विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक रणजीतसिंह शिंदे यांनी थकित वीज बिलाची रक्कम संबंधिताकडे धनादेश(चेक) द्वारे सुपूर्त केली आणि पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांना वस्तुस्थिती दाखवून सीना माढा सिंचन योजना सुरू करणे काळाची गरज असल्याचे पटवून दिले . त्यानुसार पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सकारात्मकता दर्शवून जलसंपदा विभाग सोलापूरचे अधीक्षक अभियंता यांना रणजीत सिंह शिंदे यांनी वीज बिलाच्या थकीत रकमेचे पैसे भरलेले दाखवून दिले आणि त्यानुसार गुरुवार 22 जानेवारीपासून सीना माढा सिंचन योजनेचे दोन पंप तूर्तास चालू करण्यात आले व आगामी चार ते पाच दिवसात पाच पंप चालू करून 220 क्युसेक्स विसर्गाने पाणी या सिंचन योजनेद्वारे सुरू करण्यात येणार असून माढा तालुक्यातील लाभक्षेत्रातील शेतीसाठी रब्बीचे आवर्तन मिळणार आहे . या पाण्यामुळे गहू ज्वारी हरभरा तुरी मका चारा वैरण ऊस केळी डाळिंब आदी फळबागा यांना पाणी मिळणार असून या लाभक्षेत्रातील ओढे, नाले, बोरवेल, विहिरी व तलाव यांच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे तसेच या भागातील पिण्याच्या पाण्याचा निर्माण झालेला बिकट प्रश्नही सुटणार आहे, त्यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.
    विशेष माहिती अशी की माजी आमदार बबनदादा शिंदे यांनी मागील वीस वर्षापासून व्यवस्थित कार्यान्वित ठेवलेली सीना माढा सिंचन योजना मागील वर्षी विधानसभा निवडणुकीनंतर काही शेतकऱ्यांनी आपल्या ऊस बिलातून साखर कारखान्याने पाणीपट्टी कपात करु नये असे कारखान्याला कळवल्यामुळे पाणीपट्टी कपात करण्यात आली नाही ,याचा परिणाम म्हणजे थकीत राहिलेले 73 लाख रुपये विज बिल कसे भरायचे हा प्रश्न उभा राहिला व ही योजना सुरू होते की नाही …?असा प्रश्न शेतकऱ्यांच्या पुढे उभा राहिला कारण बिल भरल्याशिवाय विद्युत पुरवठा सुरू होणार नाही हे सर्वांनाच माहीत झाले. याबद्दल दैनिक ‘पुण्यनगरी’ मधून सातत्याने आवाज उठवण्यात आला व शासनास ही वस्तुस्थिती निदर्शनास आणून देण्यात आली. या योजनेबद्दल अनेक कार्यकर्ते व लोकप्रतिनिधीनी पोकळ वल्गना केल्या परंतु सीना माढा योजना सुरू व्हावी म्हणून रणजीत सिंह शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ,तसेच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे सह मुंबई मंत्रालयात बैठक लावून हा प्रश्न सोडवावा अशी आग्रही मागणी केली व त्यानंतर आता गुरुवार 22 जानेवारीपासून योजना कार्यान्वित होत आहे.
    सध्या उजनी जलाशयातून कालवा, बोगदा, दहिगाव सिंचन योजना मधून सर्वत्र रब्बी हंगामाचे आवर्तन सुरू झाले आहे,मात्र सीना माढा सिंचन योजना सुरू होण्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते ,परंतु रणजितसिंह शिंदे यांनी गुरुवारी थकीत लाईट बिला पोटी धनादेश (चेक) संबंधिताकडे सुपूर्त केला असून त्यामुळे विद्युत मंडळाने वीज पुरवठा सुरु करण्यास सकारात्मकता दर्शवली असल्यामुळे 22 जानेवारीपासून ही योजना पून्हा कार्यान्वित होत आहे. यामुळे सिना माढा सिंचन योजनेच्या 32 गावातील चाळीस हजार एकर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना अतिशय समाधान वाटत आहे. याबद्दल लाभक्षेत्रातील शेतकऱ्याकडून रणजीत सिंह शिंदे यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यापुढे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आपल्या पिकांना व्यवस्थित पाणी घ्यावे अशी अपेक्षा जलसंपदा विभागाकडून व्यक्त होत आहे.
    माढा तालुक्याचे माजी सभापती विक्रमसिंह शिंदे यांनी या ठिकाणी जाऊन पाहणी केली तसेच पाणी सोडल्याबद्दल समाधान व्यक्त केले व अधिकाऱ्यांना धन्यवाद दिले .तसेच धरण नियंत्रण विभागाच्या कार्यकारी अभियंता सुचेता डुंबरे यांनी देखील ही योजना सुरू होण्यासाठी तत्परता दाखवली आहे . याचवेळी शेतकऱ्यांनी वेळेवर पाणीपट्टी भरुन सहकार्य करावे असे आव्हान कार्यकारी अभियंता सुचेता डुंबरे यांनी केले आहे.

Translate »
error: Content is protected !!