बेंबळे ..प्रतिनिधी
येथील पाटबंधारे खात्यातील सेवानिवृत्त कर्मचारी दत्तात्रय (आबा) मच्छिंद्र लोंढे यांच्या मातोश्री व राज्य पातळीवरील अभ्यासू वक्ते आणि सिंहगड इन्स्टिट्यूट पुणे येथे प्राध्यापक औदुंबर लोंढे यांच्या आजी स्वर्गीय श्रीमती गोदाबाई मच्छिंद्र लोंढे यांच्या प्रथम पुण्यतीथीस्मरणा निमित्त गुरुवार दिनांक 20 जून 24 रोजी सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत येथील श्री विमलेश्वर विद्यालयाचे प्रांगणात ,महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार रामायणाचार्य ह .भ. प. रामरावजी ढोक महाराज यांच्या उद्बोधक कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे लोंढे परिवाराचे वतीने कळविण्यात आले आहे. यानंतर स्वर्गीय श्रीमती गोदाबाई लोंढे यांचे प्रतिमेवर पुष्पवृष्टी संपन्न होणार असून त्यानंतर भोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे लोंढे परिवाराच्या वतीने कळवण्यात आलेआहे.